धार संस्थान आणि पवार घराणे

Dhar State and the Pawar dynasty, 1728–1948

पहिला मसुदा. हे पान सध्या इंग्रजी संदर्भग्रंथ व संकेतस्थळांवर आधारित आहे; मूळ कागदपत्रांशी व गॅझेटियरशी पडताळणी अद्याप बाकी आहे. जिथे स्रोतांत मतभेद आहेत तिथे तसे नमूद केले आहे.
First draft. This page rests on reference works and websites, not yet on the Imperial Gazetteer or archival papers. Where the sources disagree, the page says so. Numbers in brackets point to the source list at the end.

1728–1948संस्थानाचा काळ · span of the state 1
4,660 km²क्षेत्रफळ, १९४१ · area in 1941 1
253,210लोकसंख्या, १९४१ · population in 1941 1
15तोफांची सलामी · gun salute 3

धार: परमारांची जुनी राजधानी

धार हे माळव्यातील प्राचीन नगर परमार राजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. धारचे पवार (पुआर) राजे स्वतःला याच परमार कुळाचे वंशज मानत.2 १५६० मध्ये धार अकबराच्या ताब्यात गेले व माळवा सुभ्यात समाविष्ट झाले. १६९० मध्ये मराठ्यांनी प्रथमच नर्मदा ओलांडली आणि धरमपुरी परगण्यावर स्वारी केली; त्यानंतर या प्रदेशावर मराठ्यांच्या स्वाऱ्या सतत होत राहिल्या.4

ब्रिटिश काळात हे संस्थान सेंट्रल इंडिया एजन्सीत होते. त्याच्या उत्तरेस रतलाम व सैलाना, दक्षिणेस बडवानी, पश्चिमेस झाबुआ, आणि पूर्वेस ग्वाल्हेर व इंदूर संस्थानांचे भाग होते.1

Dhar, the old Paramara capital

Dhar, an ancient city of Malwa, was famous as the capital of the Paramara kings, and the Pawar (Puar) rulers of Dhar claimed descent from that clan.2 Akbar took Dhar in 1560 and placed it in the Malwa province. In 1690 the Marathas crossed the Narmada for the first time and raided the Dharampuri district; Maratha raids on the region continued from then on.4

Under the British the state belonged to the Central India Agency. Ratlam and Sailana lay to its north, Barwani to the south, Jhabua to the west, and parts of Gwalior and Indore to the east.1

उदाजीराव पवार आणि संस्थानाची स्थापना

१७२३ मध्ये निजामाने माळव्याची सुभेदारी सोडली तेव्हा उदाजी पवार यांनी धारमध्ये काही काळ ठाणे बसविले, पण नवा सुभेदार गिरधर बहादूर आल्यावर त्यांना माघार घ्यावी लागली.4 १७२८ मध्ये उदाजी व त्यांचे बंधू थोरले बाजीराव पेशवे यांच्या माळवा मोहिमेत सहभागी झाले आणि या कामगिरीबद्दल उदाजींना धारची जहागीर मिळाली.5 १७२९–३० मध्ये त्यांनी गिरधर बहादूर व त्याचा उत्तराधिकारी दया बहादूर यांचा पराभव केला आणि मध्य भारतात मराठ्यांच्या वर्चस्वाचा मार्ग मोकळा झाला.4

सुरुवातीला गादी मुलथान येथे होती; १७३२ पासून धार ही राजधानी झाली.1 स्थापनेचे वर्ष निरनिराळ्या स्रोतांत १७२८, १७२९ किंवा १७३० असे दिले आहे.

Udaji Rao Pawar and the founding

When the Nizam gave up the governorship of Malwa in 1723, Udaji Pawar held Dhar briefly, but had to withdraw once the new governor, Girdhar Bahadur, arrived.4 In 1728 Udaji and his brothers rode with Peshwa Bajirao I on the Malwa campaign, and Udaji was rewarded with Dhar as his estate.5 In 1729–30 he defeated Girdhar Bahadur and his successor Daya Bahadur, which opened Central India to Maratha power.4

The first seat was at Multhan; Dhar became the capital in 1732.1 Sources give the founding year variously as 1728, 1729 or 1730.

आनंदराव पहिले: धारची गादी स्थिर होते

१७३२ मध्ये उदाजींवर पेशव्यांची इतराजी झाली व त्यांना कैद झाली; त्यांचे धाकटे बंधू आनंदराव धारचे राजे झाले आणि त्यांच्याच वंशजांनी पुढे स्वातंत्र्यापर्यंत राज्य केले.6 १७४२ मध्ये पेशव्यांनी सनद देऊन आनंदरावांची धारची जहागीर कायम केली. होळकर व शिंदे यांच्याबरोबर माळव्याच्या कारभारात वाटा असलेले ते मध्य भारतातील प्रमुख सरदार ठरले.4

ज्या नगरीतून परमारांना सात शतकांपूर्वी जावे लागले होते, तिथेच त्यांचे वंशज म्हणविणारे घराणे पुन्हा राज्यावर आले, हा योगायोग जुन्या इंग्रज लेखकांनीही नोंदविला आहे.7

Anand Rao I: the line settles at Dhar

In 1732 Udaji fell out of favour with the Peshwa and was imprisoned. His younger brother Anand Rao became Raja of Dhar, and Anand Rao's descendants ruled until Indian independence.6 In 1742 the Peshwa confirmed Anand Rao in the fief of Dhar by a formal grant. He became one of the leading chiefs of Central India, sharing the control of Malwa with Holkar and Sindhia.4

Older English writers remarked on the coincidence: a house claiming Paramara descent now ruled from the very city the Paramaras had lost seven centuries earlier.7

धार, देवास आणि आपले घराणे

देवासचे संस्थापक तुकोजीराव व जिवाजीराव हे उदाजीरावांचे चुलत बंधू होते; तेही सुमारे १७२८ मध्ये बाजीरावांबरोबर मध्य भारतात आले.8 एका वंशावळीनुसार शिवकालीन सरदार केरोजी पवार यांचे पुत्र संभाजीराव, आणि संभाजीरावांचे पुत्र उदाजीराव; तर बुबाजीराव हे देवासच्या थोरल्या पातीचे मूळ पुरुष.5

ही मांडणी विश्वासराई लेखातील कुळपरंपरेशी जुळते: तिथे साबुसिंग पवार हे धार व देवास या दोन्ही घराण्यांचे मूळ पुरुष, आणि कृष्णाजी पवारांचे पुत्र बुबाजी, रायाजी व केरोजी असे सांगितले आहे. म्हणजे धारची गादी केरोजींच्या शाखेतून आणि देवासची गादी बुबाजींच्या शाखेतून आली, असे या दोन्ही परंपरा सांगतात. ही जुळणी मूळ कागदपत्रांवरून तपासणे बाकी आहे.

Dhar, Dewas and our own family

Tukoji Rao and Jiwaji Rao, the founders of Dewas, were first cousins of Udaji Rao, and they too came into Central India with Bajirao around 1728.8 One published king list gives Keroji Pawar, an officer of Shivaji's time, as father of Sambhaji Rao and grandfather of Udaji Rao, and names Bubaji Rao as the founding figure of the senior house of Dewas.5

That agrees with the family tradition in the Vishwasrai article, which names Sabusingh Pawar as the common ancestor of the Dhar and Dewas houses, and Bubaji, Rayaji and Keroji as the sons of Krishnaji Pawar. On both accounts the Dhar line descends from Keroji and the Dewas line from Bubaji. The match has not yet been checked against original papers.

यशवंतराव पहिले आणि पानिपत

यशवंतराव पवार (राज्यकाळ १७३६–१७६१) यांनी मराठा साम्राज्याच्या उत्तरेकडील विस्तारात महत्त्वाची कामगिरी बजावली. १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात त्यांनी वजीर शाह वली खानाचा मानलेला पुत्र अताई खान याला हत्तीवरून ठार केले, असे सांगितले जाते.1 त्यांचा राज्यकाळ जानेवारी १७६१ मध्ये संपला.

त्यांच्यानंतर खंडेराव (१७६१–१७८२) व आनंदराव दुसरे (१७८२–१८०७) गादीवर आले.1

Yeshwant Rao I and Panipat

Yeshwant Rao Pawar (ruled 1736–1761) played a prominent part in the northward expansion of Maratha power. At the Third Battle of Panipat in 1761 he is said to have killed Atai Khan, the adopted son of the Afghan wazir Shah Wali Khan, from the back of his elephant.1 His reign ended in January 1761.

He was followed by Khande Rao (1761–1782) and Anand Rao II (1782–1807).1

संकटाचा काळ आणि मैनाबाई

अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस पेंढाऱ्यांच्या धाडींमुळे संस्थानाचा मुलूख सतत आक्रसत गेला.1 आनंदराव दुसरे यांच्या निधनानंतर (१८०७) त्यांच्या पत्नी मैनाबाई यांनी अल्पवयीन रामचंद्रराव यांच्या वतीने कारभार पाहिला. शिंदे व होळकर यांच्या हल्ल्यांना त्यांनी ज्या धैर्याने व निर्धाराने तोंड दिले त्याबद्दल त्या प्रसिद्ध आहेत.3

१० जानेवारी १८१९ रोजी धारने ईस्ट इंडिया कंपनीशी तह केला. या तहाने संस्थानाला ब्रिटिश संरक्षण मिळाले, गमावलेला काही मुलूख परत मिळाला, आणि धारने ब्रिटिश सार्वभौमत्व मान्य केले.13

Hard years, and Maina Bai

Around the turn of the nineteenth century Pindari raids steadily whittled away the state's territory.1 After Anand Rao II died in 1807 his widow Maina Bai governed as regent for the infant Ramchandra Rao. She is remembered for the courage and determination with which she resisted the attacks of Sindhia and Holkar.3

On 10 January 1819 Dhar signed a treaty with the East India Company. It brought British protection and the return of some lost territory, and Dhar in turn acknowledged British supremacy.13

१८५७: जप्ती आणि पुनर्स्थापना

२३ मे १८५७ रोजी यशवंतराव दुसरे यांचे निधन झाले. त्यांनी मृत्युशय्येवर दत्तक घेतलेले धाकटे सावत्र बंधू आनंदराव तिसरे (जन्म १८४४) गादीवर आले; ते तेव्हा अल्पवयीन होते.15 त्याच वर्षी संस्थानाच्या फौजेने बंड केले व धारचा किल्ला बंडखोरांच्या ताब्यात गेला. दरबाराचा बंडात हात असल्याचा आरोप ठेवून ब्रिटिशांनी नोव्हेंबर १८५७ पासून संस्थान आपल्या व्यवस्थेखाली घेतले आणि जप्त केले.39

१ मे १८६० रोजी संस्थान आनंदरावांना परत देण्यात आले; मात्र बैरसिया हा वेगळा पडलेला परगणा भोपाळच्या बेगमला देण्यात आला.17 राजे वयात येईपर्यंत, म्हणजे १८६४ पर्यंत, कारभार ब्रिटिश देखरेखीखाली राहिला.3 धार खरोखर परत दिले गेले की नाही, असा प्रश्न एप्रिल १८६४ मध्ये ब्रिटिश संसदेतही विचारला गेला होता.10

1857: confiscation and restoration

Yeshwant Rao II died on 23 May 1857. Anand Rao III (born 1844), a younger half-brother whom he adopted on his deathbed, succeeded as a minor.15 That year the state's troops mutinied and rebels occupied Dhar fort. Alleging that the court was complicit, the British took the state under their own management from November 1857 and confiscated it.39

On 1 May 1860 the state was restored to Anand Rao, except for the detached district of Bairsia, which was given to the Begum of Bhopal.17 The administration stayed under British supervision until the Raja came of age in 1864.3 Whether Dhar had in fact been handed back was still being asked in the House of Commons in April 1864.10

आनंदराव तिसरे ते विलीनीकरण

आनंदराव तिसरे यांना १८७७ मध्ये 'महाराजा' हा वैयक्तिक किताब व के.सी.एस.आय. हा सन्मान मिळाला. २९ जुलै १८९८ रोजी त्यांचे निधन झाले.1 त्यांच्यानंतर उदाजीराव दुसरे ऊर्फ बाबासाहेब (जन्म १८८६) यांनी १९२६ पर्यंत राज्य केले.1

१९२६ मध्ये आनंदराव चौथे (जन्म १९२०) गादीवर आले; १९३१ पर्यंत लक्ष्मीबाई साहेब यांनी राजप्रतिनिधी म्हणून कारभार पाहिला.1 स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये धार संस्थान मध्य भारत संघात विलीन झाले, आणि १ नोव्हेंबर १९५६ रोजी मध्य भारत मध्य प्रदेशात समाविष्ट झाला.111

From Anand Rao III to the merger

Anand Rao III received the personal title of Maharaja and the K.C.S.I. in 1877, and died on 29 July 1898.1 Udaji Rao II, known as Baba Sahib (born 1886), then ruled until 1926.1

Anand Rao IV (born 1920) succeeded in 1926, with Laxmibai Sahiba as regent until 1931.1 After independence Dhar was merged into the Madhya Bharat union in 1948, and on 1 November 1956 Madhya Bharat became part of Madhya Pradesh.111

धारचे राज्यकर्ते · Rulers of Dhar 1

राज्यकाळ · ReignनावNameजन्म–मृत्यू · Life
1728–1732उदाजीराव पहिलेUdaji Rao I
1732–1736आनंदराव पहिलेAnand Rao Id. 1749
1736–1761यशवंतराव पहिलेYeshwant Rao I1724–1761
1761–1782खंडेरावKhande Raoc. 1758–1782
1782–1807आनंदराव दुसरेAnand Rao II1782–1807
1807–1810रामचंद्रराव पहिले (राजप्रतिनिधी: मैनाबाई)Ramchandra Rao I (regent: Maina Bai)1807–1810
1810–1833रामचंद्रराव दुसरेRamchandra Rao II1805–1833
1834–1857यशवंतराव दुसरेYeshwant Rao II1823–1857
1857–1858आनंदराव तिसरे (पहिली वेळ)Anand Rao III (first time)1844–1898
1858–1860संस्थान जप्तState confiscated
1860–1898आनंदराव तिसरे (दुसरी वेळ)Anand Rao III (second time)1844–1898
1898–1926उदाजीराव दुसरे "बाबासाहेब"Udaji Rao II "Baba Sahib"1886–1926
1926–1948आनंदराव चौथे (१९३१ पर्यंत राजप्रतिनिधी: लक्ष्मीबाई साहेब)Anand Rao IV (regent to 1931: Laxmibai Sahiba)b. 1920

स्रोतांतील मतभेद व तपासायच्या गोष्टी

स्थापना कोणी व केव्हा? बहुतेक स्रोत उदाजीरावांना संस्थापक मानतात (१७२८ किंवा १७२९); एक संकेतस्थळ यशवंतराव पवार यांचे नाव देते.3 जहागीर छत्रपतींकडून मिळाली की पेशव्यांकडून, यातही फरक आहे.12

यशवंतराव पहिले यांचा शेवट. यादीत त्यांचा राज्यकाळ ६ जानेवारी १७६१ ला संपतो, पण पानिपतचे युद्ध १४ जानेवारी १७६१ रोजी झाले. त्यामुळे ही तारीख किंवा अताई खानाची कथा, यांपैकी एक तरी पुन्हा तपासली पाहिजे.1

पुनर्स्थापना. बहुतेक स्रोत १८६० सांगतात; एका ठिकाणी १८६४ दिले आहे, जे राजे वयात आल्याचे वर्ष असावे.23

विलीनीकरणाची तारीख. एक स्रोत १५ जून १९४८ देतो; मध्य भारत संघ २८ मे १९४८ रोजी स्थापन झाला.311

आनंदराव चौथे यांचे निधन. स्रोतांत १९८० व १९८९ अशी दोन्ही वर्षे आढळतात.16

Where the sources disagree, and what to check

Who founded the state, and when? Most sources name Udaji Rao (1728 or 1729); one website names Yashwant Rao Pawar.3 They also differ on whether the grant came from the Chhatrapati or from the Peshwa.12

The end of Yeshwant Rao I. The ruler list ends his reign on 6 January 1761, yet Panipat was fought on 14 January 1761. Either that date or the Atai Khan story needs rechecking.1

The restoration. Most sources say 1860; one says 1864, which is probably the year the Raja came of age.23

The merger date. One source gives 15 June 1948; the Madhya Bharat union itself was created on 28 May 1948.311

The death of Anand Rao IV. Both 1980 and 1989 appear in the sources.16

संदर्भ · Sources

  1. "Dhar State", Wikipedia. en.wikipedia.org/wiki/Dhar_State. Ruler list, dates, borders, area and population.
  2. Earlier copies of the same Wikipedia article, which differ on the grant and the restoration year. archived copy.
  3. "Dhar", Indian Rajputs genealogy site. indianrajputs.com/view/dhar. Gun salute, 1819 treaty terms, 1857 account, Maina Bai, merger date.
  4. "Dhar", Mintage World history notes. mintageworld.com/history/detail/217-dhar. Events of 1560, 1690, 1723–1730 and the 1742 grant. The page names no source of its own.
  5. "Marathas (Dhar)", The History Files king lists. historyfiles.co.uk. The 1728 grant, the Keroji and Bubaji lines, the 1857 adoption.
  6. "Puar Rajputs", archived Wikipedia article. archived copy. Udaji's fall in 1732 and Anand Rao's succession.
  7. Encyclopædia Britannica, 11th edition (1911), article "Dhar". The 1742 grant, the Paramara coincidence, the 1857 confiscation and the 1860 restoration without Bairsia.
  8. "Dewas", Mintage World history notes. mintageworld.com/history/detail/215-dewas. Udaji as first cousin of the Dewas founders.
  9. K. L. Srivastava, The Revolt of 1857 in Central India–Malwa. scan at the National Virtual Library of India. British management of Dhar from November 1857.
  10. House of Commons debate, 22 April 1864, question on the territory of Dhar. Hansard.
  11. "Madhya Bharat", Wikipedia. wikipedia.org/wiki/Malwa_Union. Creation on 28 May 1948 and merger into Madhya Pradesh on 1 November 1956.

Still to consult: the Imperial Gazetteer of India entry for Dhar, Malcolm's Memoir of Central India, and the India Office papers on the confiscation of Dhar held at the British Library.